या पूर्वी:
भाग १
पण..... अनिताबरोबरचं संभाषण मी परत आठवू लागलो. त्यात कसलीतरी गोम होती. कदाचीत तीनं ड्रिंक्स घेतली असल्यामुळे असेल.. पण तरीही तिचा स्वर मला जरा वेगळाच वाटत होता. ... हा... अर्थात... आत्तापर्यंत माझ्या हे लक्षातच आलं नाही.. लिहिण्यामुळे नक्कीच मदत होते. ती कुठल्याश्या पार्टीला गेली होती ना. मग फोनवर कुठलाच आवाज येत कसा नव्हता? जरी ती फोन करण्यासाठी म्हणून बाहेर गेली असेल... नाही तसंही नसणार.. कारण असं जरी समजलं तरी मग फोनवर बॅकग्राउंडला वार्याचा किंवा कसला तरी आवाज यायला हवा होताच ना. मला तरी असला कुठला आवाज ऐकू आला नाही. काहीतरी गडबड नक्किच आहे.
सोमवार
*****
कोणीतरी ऑनलाईन आल्यामुळे कॉंप्युटरने बीप केलं. बघितलं तर मिलिंद. माझ्या कॉलेजमधलाच एक ओळखीचा मुलगा.. निदान थोडावेळ तरी त्याच्याशी विडियो चॅट करावं .. निदान कोणाचातरी चेहरा बघायला मिळेल म्हणून मी माझ्या कपाटातून एक जुना वेबकॅम काढला. मिलिंदला विडोयोवर येण्यासाठी सांगितलं. आधी तर तो तयार नव्हता पण नंतर आला. त्याचा चेहरा कसा दिसत होता कसं सांगू ? त्याच्या चेहर्यावर कुठलेही भाव नव्हते. ना आनंद ना राग.. अगदी कोरा चेहरा ठेउन तो बोलत होता... नाही बोलत मीच होतो.. तो फक्त हो किंवा नाही एवढीच उत्तरं देत होता.. पण जाता जाता त्याने माझा इमेल मागून घेतला.. इमेल वर टच मधे राहू असं म्हणून त्याने चॅट बंद केलं... आश्चर्यच आहे.. त्यानी मागच्याच आठवड्यात मला माझ्या प्रॉजेक्टच्या संदर्भात इमेल पाठवलं होतं. मग पुन्हा त्याला माझा इमेल कशाला हवाय ? कदाचित हरवला असेल.. किंवा तो आत्ता कामात असेल.. मी स्वतःला समजवायचा प्रयत्न करत होतो.. पण शंका मनातून जात नव्हतीच.
****
विचार कर करून डोकं फुटायची पाळी आली आहे. प्रथम मी माझ्या खोलीच्या बाहेर माझा वेबकॅम सेट करून ठेवला. जेणेंकरून मला निदान पॅसेजमधे कोणी आलं तर दिसू शकेल. नंतर वेड्यासारखा खोलीभर फिरून मी कुठे नेटवर्क सिग्नल मिळतोय का ते बघितलं... बाथरूमच्या एका टोकाला अगदी थोडा सिग्नल मिळत होता. लगेच मला आठवत असलेल्या नसलेल्या सगळ्यांना मी मेसेज पाठवला... "गेल्या काही दिवसांत तुम्ही कोणाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय का ?"
मी आता फक्त फोनवर उत्तराची वाट बघत होतो. कोणाचंही.. कसंही.. भले माझी चेष्टा मस्करी करणारं.. मला वेड्यात काढणारं का असेना... मला उत्तर हवं होतं... मला कोणी फोन केला तर नेटवर्क नसल्यामुळे तो कट होण्याची शक्यता होती.. म्हणून मग मी माझा फोन बाथरूमच्या त्या भिंतीजवळच ठेऊन दिला..
किती वेळ मी नुसताच बसून होतो कोणास ठाऊक. उत्तर कोणाचंच आलं नव्हतं. मी फोनवर माझ्या इतर मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्क सिग्नल नीट मिळत नसल्यामुळे तो होऊ शकला नाही. मग काँप्युटरवरच्या चॅट लिस्ट्मधे पाहिलं.. फार कोणी ऑनलाईन नव्हते आणि जे होते त्या सगळ्यांना मी मेसेज पाठवला. पण तिथेही कोणाचं उत्तर आलं नाही. माझा धीर आता अगदीच सुटत चालला होता. माझ्या ईमेल लिस्टमधल्या सगळ्या लोकांना "मला प्लिज एकदा तरी भेटून जा!!! " असा ईमेल पाठवला.. तो वाचणार्याला माझ्याबद्धल काय वाटेल हा विचार करण्याच्या पलिकडे मी गेलो होतो. मला कोणीतरी भेटायला हवं होतं.
मंगळवार
फोन वाजतोय.. पळत पळत बाथरूममधे ठेवलेला फोन मी उचलून कानाला लावला. नेटवर्क जाउ नये म्हणून शक्य तितकी मान वाकडी करून सिग्नल जास्त मिळेल अशा प्रकारे उभा राहून बोलत होतो. अनिताचा फोन होता. माझी तिला खूप काळजी वाटत होती.होता.तिच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याशी संपर्क साधण्याचा तिने खूप प्रयत्न केला. ती मला भेटायला माझ्या घरी येतेय. हो.. आज तिला माझा पत्ता ठाऊक आहे.. मी न सांगता... मला माझीच लाज वाटायला लागली. ती इथे येण्याआधी ही डायरी मी फाडून टाकणार आहे. उगाच कोणी वाचायला नको. तरीही मी हे का लिहितोय ते मला समजत नाहिये. कदाचीत इतके दिवस कोणाशीच न बोलल्यामुळे माझ्या विचारांना व्यक्त करायचं हेच एक साधन उरलं आहे. .म्हणून ? ते काही असो.. अनिता येणार म्हणून थोडं बरं वाटतं आहे. आरशात माझा अवतार अगदी बघवत नाहिये.. नीट झोप न झाल्यामुळे डोळ्यांखाली खूप काळं झालंय.. केस अस्ताव्यस्त.. दाढी वाढलेली. अगदीच आजारी माणसासारखा दिसतोय मी.
माझी खोलीसुद्धा अगदी अस्ताव्यस्त झाली आहे. पण आता खोली आवरायला वेळ नाही. असू दे तशीच ! मी इतके दिवस कसे काढले हे समजेल तरी तिला. असो...
दुसर्या कोणाचं उत्तर येण्याआधी अनिताचं उत्तर आलं म्हणून मला जरा बरंच वाटतंय. ती खरंच माझी काळजी करत असणार. तिच्या आठवणींबरोबर मन खूप हलकं झालं. दरवाजा वाजतोय.. अनिताच असेल.
मी दरवाजा उघडणार इतक्यात कॉप्युटरवर माझं लक्ष गेलं. दरवाज्याबाहेर ठेवलेल्या वेब्-कॅमवरून मला कोणीच दिसत नव्हतं. अनिता येताना सुद्धा दिसली नव्हती. कदाचीत मी तो नीट ठेवला नसेल.. किंवा हलला असेल. म्हणून मी दरवाज्याजवळ जाउन मोठ्या आवाजात म्हटलं ... "अनिता! अगं दरवाज्यात मी एक वेब्-कॅम ठेवेलेला.. दिसतोय? जरा तो नीट ठेवशील ? मला त्यात तू दिसत नाहियेस" ... थोडा वेळ झाल्यावर कॅमेरामधून तिचा चेहरा मला कॉम्प्युटर वर दिसू लागला...
"हाय! हे काय नविनच?" अनिताचा परिचीत स्वर कानी पडला. तीच्या चेहर्यावर आश्चर्य दिसत होतं.
"माझ्या खोलीच्या दाराला काही पीप-होल नाहिये. म्हणून मग हा कॅमेरा लावला. गेले काही दिवस मला थोडं बेचैन वाटत होतं.. "
"ह्म्म... नक्कीच... आता काही काळजी करू नकोस.. दार उघड."
तिच्या स्वरांमधे अधीरता होती.. काळजी नव्हती. मी जरा भांबावलो. ती नक्की अनिताच आहे हे मला कसं कळणार?
"अनिता... एक गंमत म्हणून विचारतो...एखादा कूटप्रश्न विचारतात ना तसं.... फक्त तुला आणि मलाच माहित असलेली अशी एखादी गोष्ट सांग बरं! तू तूच आहेस हे सिद्ध करण्यासाठी"
तिच्या चेहर्यावर थोडी रागाची छटा दिसू लागली.
"संदिप ! काय हा फालतूपणा!! " थोड्या वेळाने ती म्हणाली... "अं.. ठिक आहे. आपण वसंतनगर मधल्या एका मॉलमधे भेटलो. एका कॅसेटस् च्या दुकानात.. दोघांनीही एकच कॅसेट एकाच वेळेला मागितली... नंतर हळूहळू परिचय वाढला."
मी सुस्कारा टाकला.. तीने जे सांगितलं ते अगदी बरोबर होतं. मी तरी किती मूर्ख. अनितावर संशय मी कसा काय घेतला? तीची माझी भेट कशी झाली हे मी कोणालाच सांगितलं नव्हतं. जर मला वाटत असल्याप्रमाणे कोणी मला घराबाहेर काढण्याचं षडयंत्र रचत असेल तर त्यांनाही ह्या घटनेबद्धल कसं काय कळणार होतं?
"बरोबर! मी दार उघडल्यावर सगळं तुला सांगतो! जस्ट एक मिनिट" मी हसून म्हणालो.
पटकन बाथरूम मधे जाउन मी केस विंचरले. कपडे नीट केले. दाढी करायला आता अर्थात वेळ नव्हता. पण तिला माझी अवस्था समजेल. स्वतःशीश हसत विचार करत मी पटपट बाहेर आलो. एक हात दरवाज्याच्या कडीवर ठेउन मी एकवार माझ्या खोलीकडे नजर टाकली. सगळं सामान पसरलं होतं... इतक्यात माझं लक्ष ह्या डायरीवर गेलं. मी मघाशीच लिहिलेले शब्द मला आठवले. मी अनिताच्या पहिल्या भेटीविषयी मघाशीच लिहिलं होतं.. तेच शब्द अगदी तस्सेच अनिताने म्हणून (की वाचून) दाखवले.. पण कसे?? मग एकदम मला आठवलं.. मी डायरी लिहित असताना माझा वेबकॅम मी टेबलवर डायरीच्या बाजूलाच ठेवला होता.... मी मिलिंदशी बोलण्यासाठी बाहेर काढला होता.. म्हणजे.. मी जे काही केलं.. जे काही लिहिलं... ते सगळं "त्यांना" कळलं असणार..... .
(क्रमशः)
पुढचे भाग:
भाग ३

काल रात्री कधी डुलकी लागली कळलंच नाही. आत्ता जरा फ्रेश झाल्यावर पुन्हा एकदा बिल्डींगच्या गेटपर्यंत जाऊन डोकाऊन आलो. आज विचार करताना कालचं माझं वागणं अगदीच अगदी हास्यास्पद वाटतोय मला. थोडा वेळ बाहेर चांगलं उन पडलंय. आता थोडावेळ इमेल चेक करतो, मग आंघोळ दाढी वगैरे करून जरा बाहेर पडतो. थोडं डोकं तरी ठिकाणावर येईल.
****
बाहेर पडणार इतक्यात विजेचा जोरदार कडकडाट ऐकू आला. आत्ता तर ऊन पडलं होतं.. ? लगेच इतकं आकाश भरून आलं? आता बाहेर पडण्यात काही अर्थ नव्हता. पण तरीही मी बाहेर कोणी दिसतंय का ते बघायला गेट पर्यंत गेलो. बाहेर फक्त मुसळधार पाउस आणि तुडुंब भरून वाहणारी गटारं. रस्त्यावर कोणीही नव्हतं. कालचे विचार परत मनात येऊ लागले आहेत.
****
बाहेर पडणार इतक्यात विजेचा जोरदार कडकडाट ऐकू आला. आत्ता तर ऊन पडलं होतं.. ? लगेच इतकं आकाश भरून आलं? आता बाहेर पडण्यात काही अर्थ नव्हता. पण तरीही मी बाहेर कोणी दिसतंय का ते बघायला गेट पर्यंत गेलो. बाहेर फक्त मुसळधार पाउस आणि तुडुंब भरून वाहणारी गटारं. रस्त्यावर कोणीही नव्हतं. कालचे विचार परत मनात येऊ लागले आहेत.
*****
कोणीतरी ऑनलाईन आल्यामुळे कॉंप्युटरने बीप केलं. बघितलं तर मिलिंद. माझ्या कॉलेजमधलाच एक ओळखीचा मुलगा.. निदान थोडावेळ तरी त्याच्याशी विडियो चॅट करावं .. निदान कोणाचातरी चेहरा बघायला मिळेल म्हणून मी माझ्या कपाटातून एक जुना वेबकॅम काढला. मिलिंदला विडोयोवर येण्यासाठी सांगितलं. आधी तर तो तयार नव्हता पण नंतर आला. त्याचा चेहरा कसा दिसत होता कसं सांगू ? त्याच्या चेहर्यावर कुठलेही भाव नव्हते. ना आनंद ना राग.. अगदी कोरा चेहरा ठेउन तो बोलत होता... नाही बोलत मीच होतो.. तो फक्त हो किंवा नाही एवढीच उत्तरं देत होता.. पण जाता जाता त्याने माझा इमेल मागून घेतला.. इमेल वर टच मधे राहू असं म्हणून त्याने चॅट बंद केलं... आश्चर्यच आहे.. त्यानी मागच्याच आठवड्यात मला माझ्या प्रॉजेक्टच्या संदर्भात इमेल पाठवलं होतं. मग पुन्हा त्याला माझा इमेल कशाला हवाय ? कदाचित हरवला असेल.. किंवा तो आत्ता कामात असेल.. मी स्वतःला समजवायचा प्रयत्न करत होतो.. पण शंका मनातून जात नव्हतीच.
तेवढ्यात काँप्युटरवर पुन्हा बीप वाजली. ह्यावेळेला अनिताचं इमेल होतं. "पिझ्झा खायला जाउया ला? नेहमीच्याच ठिकाणी.. वाट बघतेय. लवकर ये."
अनिता.. तिची आणि माझी ओळख पहिल्यांदा वसंत नगरमधल्या मॉल मधे झाली.. एका कॅसेटस् च्या दुकानात.. दोघांनीही एकच कॅसेट एकाच वेळेला मागितली... नंतर हळूहळू परिचय वाढला. तिच्याबरोबर तासन् तास बोलायला खूप आवडायचं.
अनिताला भेटायला घरा बाहेर पडणार इतक्या अजून एक इमेल आला. थांबून वाचला, त्याचे शब्द होते
"स्वतःच्या डोळ्यांनी ....... त्यांच्यावर विश्वास ठेऊ नको... ते.. .."
काय अर्थ आहे या शब्दांचा ? पुन्हा पुन्हा वाचून बघितलं. कोणितरी अगदी जिवावर उदार होउन शेवटचा संदेश बाहेर पोहोचू पाहात आहे.. असं उगाचच मला वाटून गेलं. ईमेल पूर्ण व्हायच्या आधीच.. काय झालं? माझ्या शंकेखोर मनाला आता आणखीनच खाद्य मिळालं. इतर कुठल्याही दिवशी हे असलं ईमेल वाचून मी ताबडतोब डिलीट केलं असतं. पण आज .. आजची गोष्ट निराळी होती.
मला थोड्यावेळापूर्वीचं विडियो चॅट वरचं संभाषण आठवलं. मी अजून कोणालाही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं. .. आता माझ्या मनातल्या शंकेला भीतीचं मूर्तस्वरूप येऊ लागलं. कालच्या आणि आजच्या घटनांचा मी संगतवार विचार करून लागलो. प्रथम नेटवर्क सिग्नल असूनही अनिताचा नंबर लागला नाही.. लगेच मला आलेला राँग नंबर.. त्याला मी माझं नाव सांगितलं... मग अनिताचा फोन. तसंच आज, विडियो चॅटवर मिलिंदने माझा ईमेल मागणं... आणि मग लगेचच अनिताचं ईमेल...म्हणजे कोणीतरी नक्कीच माझी माहिती काढून घेत आहेत... अनिता? ती पण त्यांना मिळाली असेल का? .नाही नाही.. अनिता अशी कशी वागेल? पण मग ?? "ते" मला घराबाहेर काढायला बघताहेत.. म्हणजे मी आयताच त्यांच्या तावडीत सापडीन.. म्हणूनच काल अनिता मला पार्टीसाठि बोलवत असणार.. आणि आज पिझ्झा साठी... "ते" नक्कीच मला शोधून काढतील.. अरे बापरे! मी काल फोनवर मी वसंतनगरपासून एका तासाभराच्या अंतरावर राहतो हे सांगितलं होतं. म्हणजे आता कोणत्याही क्षणी ते इथे येउ शकतील. कालपासून मी रस्त्यावरही कोणाला पाहिलं नाहीये.. आणि बिल्डींगमध्ये सुद्धा कोणी आल्या गेल्याची चाहूल लागत नाहीये.. अचानक कुठे गेले सगळे ?? नाही नाही.. असं कसं होईल ? माझ्याच मनाचे सगळे खेळ असणार.. मी शांतपणे विचार करतो.. ही वेड्यासारखी भीती संपवायलाच हवी.
****
विचार कर करून डोकं फुटायची पाळी आली आहे. प्रथम मी माझ्या खोलीच्या बाहेर माझा वेबकॅम सेट करून ठेवला. जेणेंकरून मला निदान पॅसेजमधे कोणी आलं तर दिसू शकेल. नंतर वेड्यासारखा खोलीभर फिरून मी कुठे नेटवर्क सिग्नल मिळतोय का ते बघितलं... बाथरूमच्या एका टोकाला अगदी थोडा सिग्नल मिळत होता. लगेच मला आठवत असलेल्या नसलेल्या सगळ्यांना मी मेसेज पाठवला... "गेल्या काही दिवसांत तुम्ही कोणाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय का ?"
मी आता फक्त फोनवर उत्तराची वाट बघत होतो. कोणाचंही.. कसंही.. भले माझी चेष्टा मस्करी करणारं.. मला वेड्यात काढणारं का असेना... मला उत्तर हवं होतं... मला कोणी फोन केला तर नेटवर्क नसल्यामुळे तो कट होण्याची शक्यता होती.. म्हणून मग मी माझा फोन बाथरूमच्या त्या भिंतीजवळच ठेऊन दिला..
किती वेळ मी नुसताच बसून होतो कोणास ठाऊक. उत्तर कोणाचंच आलं नव्हतं. मी फोनवर माझ्या इतर मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्क सिग्नल नीट मिळत नसल्यामुळे तो होऊ शकला नाही. मग काँप्युटरवरच्या चॅट लिस्ट्मधे पाहिलं.. फार कोणी ऑनलाईन नव्हते आणि जे होते त्या सगळ्यांना मी मेसेज पाठवला. पण तिथेही कोणाचं उत्तर आलं नाही. माझा धीर आता अगदीच सुटत चालला होता. माझ्या ईमेल लिस्टमधल्या सगळ्या लोकांना "मला प्लिज एकदा तरी भेटून जा!!! " असा ईमेल पाठवला.. तो वाचणार्याला माझ्याबद्धल काय वाटेल हा विचार करण्याच्या पलिकडे मी गेलो होतो. मला कोणीतरी भेटायला हवं होतं.
मंगळवार
फोन वाजतोय.. पळत पळत बाथरूममधे ठेवलेला फोन मी उचलून कानाला लावला. नेटवर्क जाउ नये म्हणून शक्य तितकी मान वाकडी करून सिग्नल जास्त मिळेल अशा प्रकारे उभा राहून बोलत होतो. अनिताचा फोन होता. माझी तिला खूप काळजी वाटत होती.होता.तिच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याशी संपर्क साधण्याचा तिने खूप प्रयत्न केला. ती मला भेटायला माझ्या घरी येतेय. हो.. आज तिला माझा पत्ता ठाऊक आहे.. मी न सांगता... मला माझीच लाज वाटायला लागली. ती इथे येण्याआधी ही डायरी मी फाडून टाकणार आहे. उगाच कोणी वाचायला नको. तरीही मी हे का लिहितोय ते मला समजत नाहिये. कदाचीत इतके दिवस कोणाशीच न बोलल्यामुळे माझ्या विचारांना व्यक्त करायचं हेच एक साधन उरलं आहे. .म्हणून ? ते काही असो.. अनिता येणार म्हणून थोडं बरं वाटतं आहे. आरशात माझा अवतार अगदी बघवत नाहिये.. नीट झोप न झाल्यामुळे डोळ्यांखाली खूप काळं झालंय.. केस अस्ताव्यस्त.. दाढी वाढलेली. अगदीच आजारी माणसासारखा दिसतोय मी.
माझी खोलीसुद्धा अगदी अस्ताव्यस्त झाली आहे. पण आता खोली आवरायला वेळ नाही. असू दे तशीच ! मी इतके दिवस कसे काढले हे समजेल तरी तिला. असो...
दुसर्या कोणाचं उत्तर येण्याआधी अनिताचं उत्तर आलं म्हणून मला जरा बरंच वाटतंय. ती खरंच माझी काळजी करत असणार. तिच्या आठवणींबरोबर मन खूप हलकं झालं. दरवाजा वाजतोय.. अनिताच असेल.
****
मी दरवाजा उघडणार इतक्यात कॉप्युटरवर माझं लक्ष गेलं. दरवाज्याबाहेर ठेवलेल्या वेब्-कॅमवरून मला कोणीच दिसत नव्हतं. अनिता येताना सुद्धा दिसली नव्हती. कदाचीत मी तो नीट ठेवला नसेल.. किंवा हलला असेल. म्हणून मी दरवाज्याजवळ जाउन मोठ्या आवाजात म्हटलं ... "अनिता! अगं दरवाज्यात मी एक वेब्-कॅम ठेवेलेला.. दिसतोय? जरा तो नीट ठेवशील ? मला त्यात तू दिसत नाहियेस" ... थोडा वेळ झाल्यावर कॅमेरामधून तिचा चेहरा मला कॉम्प्युटर वर दिसू लागला...
"हाय! हे काय नविनच?" अनिताचा परिचीत स्वर कानी पडला. तीच्या चेहर्यावर आश्चर्य दिसत होतं.
"माझ्या खोलीच्या दाराला काही पीप-होल नाहिये. म्हणून मग हा कॅमेरा लावला. गेले काही दिवस मला थोडं बेचैन वाटत होतं.. "
"ह्म्म... नक्कीच... आता काही काळजी करू नकोस.. दार उघड."
तिच्या स्वरांमधे अधीरता होती.. काळजी नव्हती. मी जरा भांबावलो. ती नक्की अनिताच आहे हे मला कसं कळणार?
"अनिता... एक गंमत म्हणून विचारतो...एखादा कूटप्रश्न विचारतात ना तसं.... फक्त तुला आणि मलाच माहित असलेली अशी एखादी गोष्ट सांग बरं! तू तूच आहेस हे सिद्ध करण्यासाठी"
तिच्या चेहर्यावर थोडी रागाची छटा दिसू लागली.
"संदिप ! काय हा फालतूपणा!! " थोड्या वेळाने ती म्हणाली... "अं.. ठिक आहे. आपण वसंतनगर मधल्या एका मॉलमधे भेटलो. एका कॅसेटस् च्या दुकानात.. दोघांनीही एकच कॅसेट एकाच वेळेला मागितली... नंतर हळूहळू परिचय वाढला."
मी सुस्कारा टाकला.. तीने जे सांगितलं ते अगदी बरोबर होतं. मी तरी किती मूर्ख. अनितावर संशय मी कसा काय घेतला? तीची माझी भेट कशी झाली हे मी कोणालाच सांगितलं नव्हतं. जर मला वाटत असल्याप्रमाणे कोणी मला घराबाहेर काढण्याचं षडयंत्र रचत असेल तर त्यांनाही ह्या घटनेबद्धल कसं काय कळणार होतं?
"बरोबर! मी दार उघडल्यावर सगळं तुला सांगतो! जस्ट एक मिनिट" मी हसून म्हणालो.
पटकन बाथरूम मधे जाउन मी केस विंचरले. कपडे नीट केले. दाढी करायला आता अर्थात वेळ नव्हता. पण तिला माझी अवस्था समजेल. स्वतःशीश हसत विचार करत मी पटपट बाहेर आलो. एक हात दरवाज्याच्या कडीवर ठेउन मी एकवार माझ्या खोलीकडे नजर टाकली. सगळं सामान पसरलं होतं... इतक्यात माझं लक्ष ह्या डायरीवर गेलं. मी मघाशीच लिहिलेले शब्द मला आठवले. मी अनिताच्या पहिल्या भेटीविषयी मघाशीच लिहिलं होतं.. तेच शब्द अगदी तस्सेच अनिताने म्हणून (की वाचून) दाखवले.. पण कसे?? मग एकदम मला आठवलं.. मी डायरी लिहित असताना माझा वेबकॅम मी टेबलवर डायरीच्या बाजूलाच ठेवला होता.... मी मिलिंदशी बोलण्यासाठी बाहेर काढला होता.. म्हणजे.. मी जे काही केलं.. जे काही लिहिलं... ते सगळं "त्यांना" कळलं असणार..... .
अंगावर सरसरून काटा आला. सगळ्या भावना बाजूला सारून मनात फक्त भीती व्यापून राहिली. मी दरवाज्याची कडी घट्ट धरून ठेवली... "वाचवा! वाचवा! कोणी आहे का ?" वेड्यासारखा जोरजोरात ओरडायला लागलो..... दरवाज्यावर भिंतींवर जोरजोरात हात पाय आपटून आवाज करत होतो.. कोणीतरी माझ्या मदतीला येइल... शुद्ध कधी हरपली हे मला समजलं नाही..
(क्रमशः)
पुढचे भाग:
भाग ३
No comments:
Post a Comment